जळगाव (प्रतिनिधी) वाळूचे ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारणार्या चोपडा तालुक्यातील अडावद पोलीस स्थानकात पंटरला जळगाव एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारतांना रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधित पोलीस कर्मचार्यालाही ताब्यात घेतल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. कॉन्स्टेबल योगेश गोसावी व खाजगी पंटर चंद्रकांत कोळी असे संशयितांची नावे आहेत. (Adavad Police Constable Trap By Acb Jalgaon)
तक्रारदार यांनी कर्जाद्वारे ट्रॅक्टर घेतले होते. ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करू देण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी संशयित पोलीस कर्मचारी कुंभार यांनी पाच हजारांची लाच मागितली. मात्र, तक्रारदार यांची इच्छा नसल्यामुळे त्यांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने तक्रारीनंतर सापळा रचला. त्यानंतर अडावद पोलीस स्थानकाच्या आवारातच खाजगी पंटरने लाच स्वीकारताच गोसावी यांनाही ताब्यात घेण्यात आले. एसीबीचे उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला.