कुशीनगर (वृत्तसंस्था) उ. प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणीने बिहारच्या तरुणीशी लग्न केले होते. लग्नानंतर साली आणि मेव्हण्यामध्ये गंमत-जम्मत व्हायला लागली. नाते मस्करीचे असल्यामुळे पत्नीने दुर्लक्ष केले आणि इथचं तिचा घात झाला. कारण थट्टा-मस्करी करता करता साली आपल्या मेव्हण्याच्या प्रेमात पडली. पुढं जे घडलं ते मात्र, सर्व फिल्मी होते. लग्न,ड्रामा, कोर्ट वैगैरे…वैगैरे !
कुशीनगर जिल्ह्यातील परसौनी परिसरातील रहिवासी सिंहासन राजभर यांचा मुलगा पिंटू याचे लग्न २०१९ साली बिहारच्या कल्याणपूरातील एका तरुणीशी झाले होते. लग्नानंतर पिंटूचे सासरी जाणे येणे वाढले. याच काळात पिंटूचे त्याच्या मेव्हणीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. पिंटूची पत्नी मात्र हे गमतीचे नाते आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करीत राहिली. दुसरीकडे पिंटू आणि त्याची साली एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले. यानंतर कहर म्हणजे पिंटूने आपल्या मेव्हणीशी ल्गनच करुन तिला घरी आणले. त्यानंतर पिंटूची पत्नी भडकली.
यानंतर पत्नी कोर्टात गेली आणि तिने तिच्या अधिकाराची मागणी केली. या महिलेला एक मुलगाही आहे. आपल्या बहिणीशी लग्न केल्यानंतर पिंटूने तिला मारहाण केल्याची आणि घरातून हाकून दिल्याची तक्रार तिने पोलिसांत केली आहे. बिहार कोर्टाच्या आदोशानंतर आता पिंटूसह पाच लोकांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.