धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बांभोरी गावाजवळ वाळूच्या डंपरने मोटासायकला समोऋण दिलेल्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. गणेश बाविस्कर वय २६, (मोहाडी), दिनेश सोनवणे (वय २४, पुनगाव ता. जि. जळगाव) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. दरम्यान, शिवसैनिकांनी अपघातस्थळी मदतकार्य केले.
अपघात घडल्यानंतर डंपर चालक एसएसबीटी कॉलेजच्या समोरील रस्त्याने पसार झाला. त्याचवेळी सुदैवाने धरणगाव येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, नगरसेवक विजय महाजन, जेष्ठ शिवसैनिक दिनेश लोहार यांनी अपघातस्थळी मदतकार्य केले. जखमी अवस्थेत असलेल्या तरुणांना महामार्गावरून उचलून रस्त्याचा कडेला घेतले. त्यानंतर पाळधी पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल अरुण निकुंभ यांना फोन केला. तसेच रुग्णवाहिका बोलावली. घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होत जखमींना पुढील उपचारार्थ रूग्णालयात घेऊन गेलेत.