धरणगाव (प्रतिनिधी) जळगावहून पाळधीकडे जात असताना ४० वर्षीय इसमास एका भरधाव चारचाकी उडवीत ठार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील पाळधी येथील रहिवासी असलेले संजय ढोमण सपकाळे(वय ४०) हे दि १५ रोजी दुपारी जळगावकडून पाळधी येथे जात असताना राष्ट्रीय महामार्गवरील हॉटेल सूर्याजवळ मागून येणाऱ्या चारचाकी (क्र.एम.एच.२०.एफ.यु.६४५३) ने दुचाकी (क्र. एम.एच.१९.सी.एच.४७२६) ला धडक दिली. त्यात संजय सपकाळे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी धरणगाव पोलिसात दि २० रोजी सनी संजय सपकाळे यांच्या फिर्यादी वरून चारचाकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.गजानन महाजन हे करीत आहेत.