भुसावळ (प्रतिनिधी) भरधाव आयशर वाहनाने प्रवासी रिक्षाला दिलेल्या धडकेत बुलढाणा जिल्ह्यातील 62 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला तर रिक्षा चालक जखमी झाला.
हा अपघात दीपनगर उड्डाणपुलावर 5 नोव्हेंबर रोजी रात्री 7.30 वाजता घडला होता. याप्रकरणी आयशर चालकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.