TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शासकीय कार्यालयांत निलेश राणे यांना दोन महिने प्रवेशबंदीचा आदेश

नेमकं काय दिले आदेश ? ; जाणून घ्या..

vijay waghmare by vijay waghmare
July 20, 2025
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) फैजपूरचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जेष्ठ पदाधिकारी निलेश मुरलीधर राणे यांनी शासकीय कार्यालयांत वारंवार गोंधळ घातल्याच्या प्रकरणी जळगावचे प्र. अप्पर जिल्हादंडाधिकारी जयश्री माळी यांनी कठोर कारवाई करत त्यांना १९ जुलै २०२५ पासून १६ सप्टेंबर २०२५ पर्यंत जळगाव व यावल-रावेर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध आदेश जारी केला आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अंतर्गत हा प्रतिबंधक आदेश देण्यात आला आहे.

व्हिडिओ चित्रीकरण करणे आणि मानहानी

READ ALSO

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

दि.१६ जुलै २०२५ रोजी राणे यांनी उपविभागीय अधिकारी फैजपूर यांच्या कार्यालयात अनधिकृतपणे प्रवेश करून तीन-चार अनोळखी इसमांसह व्हिडिओ चित्रीकरण केले आणि अधिकाऱ्यांना धमकावले होते. तसेच त्यांच्यावर अशोभनीय आणि वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करून कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण केला. यामुळे महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती. यापूर्वी १५ जुलै रोजी जिल्हा परिषद जळगाव येथील अधिकाऱ्यांच्या दालनातही त्यांनी असाच प्रकार केला होता.

निवेदनाद्वारे कारवाईची मागणी

राणे यांच्या या वर्तनाविरोधात रावेर, यावल तालुक्यातील तहसिलदार, नायब तहसिलदार व महसूल कर्मचारी संघटनांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देत निषेध नोंदवला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य तहसिलदार-नायब तहसिलदार संघटना (नाशिक शाखा, जळगाव) यांनीही १८ जुलै रोजी याबाबत निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली होती.

सार्वजनिक गोंधळ टाळण्यासाठी निर्णय

राणे यांचा वारंवार सरकारी कार्यालयात गोंधळ घालण्याचा, धमक्या देण्याचा व अधिकाऱ्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार पाहता अधिकारी-कर्मचारी मानसिक तणावात असून कामकाजावर नकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी हा प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आला असल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी जयश्री माळी यांनी आदेशात नमूद केले आहे.

निवडणूक अर्जासाठी एक तासाची सवलत

प्रतिबंधक आदेश काळात राणे यांना शासकीय ऑनलाईन पोर्टलवर तक्रारी नोंदविण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय जर निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज दाखल करावयाचा असल्यास त्यासाठी एक तासाची सवलत देण्यात येणार आहे.

आदेशाचे उल्लंघन केल्यास गुन्हेगारी कारवाई

या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय सहिता २०२३ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
Next Post

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्था संचलित अनुदानित आश्रम शाळा, धरणगाव येथे मौखिक आरोग्य जागरूकता व तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज ५९ कोरोनाबाधित, ३९ झाले बरे !

January 7, 2021

अमरावतीत बंदला हिंसक वळण ; आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड

November 13, 2021

‘आता गुडबाय म्हणायची वेळ’, सचिन वाझेंचं व्हॉटसअॅप स्टेटस !

March 13, 2021

शेलवड येथे अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या !

October 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group