चंद्रपूर (वृत्तसंस्था) तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले. कार अनियंत्रित झाल्याने अपघात घडल्याची प्राथमिक समोर येत आहे.
खापरी धर्मू येथील मेश्राम आणि चुनारकर कुटुंबीय कारनं सरडपार येथे तेरवीच्या कार्यक्रमासाठी जात होतं. रविवारला संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास पिंपळनेरी-खापरी मार्गावरील उमरी फाट्याजवळ कारवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे कार पलटली. या अपघातात मृतकांमध्ये सायत्रा मोतीराम मेश्राम ( वय 65 वर्ष ), मोतीराम भिकारी मेश्राम ( वय – 70 ), कमल उत्तम चूनारकर ( वय 50 वर्ष ) या तिघांचा समावेश आहे. उत्तम चुनारकर (वय 45, रा. चंद्रपूर) आणि अंकित राजू मेश्राम (वय 10, रा. खापरी) हे गंभीर जखमी झाले. पिंपळनेरी-खापरी मार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात मायलेकीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर चंद्रपुरात उपचारादरम्यान वडिलांनी प्राण सोडला. या अपघातात आणखी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूरमध्ये नेण्यात आलं आहे.