मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या आरोपीला गुजरात जामनगरमधून ताब्यात घेण्यात आलं असून मुंबई पोलीस पथक उद्या आरोपीसह मुंबईत दाखल होणार आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीच नावं मनोज दोढीया असून तो २० वर्षाचा आहे. हे कृत्य का केलं याचा शोध मुंबई पोलीस करीत आहेत.
महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईत पोलिसांनी थेट गुजरात जामनगरमधून आरोपीला बेड्या ठोकल्यात. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव मनोज देढीया आहे. विशेष म्हणजे महापौरांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देणारा हा तरुण फक्त २० वर्षाचा आहे. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विलास तुपे यांच्या पथकाने जामनगरातून मनोज देढियाला अटक केली. त्याला घेऊन पोलीस आज मुंबईत येतील. त्याने महापौरांना धमकी का दिली याची चौकशी पोलीस करत आहेत. आरोपी मनोज देढीया याला आझाद मैदान पोलिसंकडून अटक करण्यात आली आहे. देढीया याला गुजरातमधील जामनगर येथून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास हा फोन आला होता. समोरील व्यक्ती ही हिंदी भाषेतून बोलत होती. त्याने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली होती. या प्रकारानंतर किशोरी पेडणेकर यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाबाबत पोलिसांनी अत्यंत गुप्तता बाळगली होती. हा फोन शेजारील राज्यातून आल्याची माहिती समोर आली होती.