भुसावळ (प्रतिनिधी) शहरात सिंधी कॉलनी भागात हर हर महादेव दुकानातील उमेश लोकचंद छाबडिया नावाचा इसम नायलॉन मांजा शासनाने विक्री करण्यास प्रतिबंधक केले आहे. याची माहिती असताना सुद्धा तो विक्री करत असल्याची गुप्त माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लागलीच त्या ठिकाणे जाऊन त्यास ताब्यात घेतले व त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गाव उमेश लोकचंद छाबडिया (वय -२७ रा. सिंधी कॉलनी भुसावळ) असे सांगितले. त्याकडे १६०० रुपये किमतीचा नायलॉन मांजाने भरलेल्या २ चक्रि, २०० रुपये कि.च्या मांजा नसलेल्याखाली ५ चक्री, असा एकूण १,८०० रूपयाचा मुद्देमाल मिळून आला. आरोपीताची वैदयकीय तपासनी व मुदेमाल पंचनामा करुन पुढील योग्य ती कारवाईसाठी भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई स.फौ. अशोक महाजन, पो.हे.कॉ लक्ष्मण पाटील, पो.ना किशोर राठोड, पो.ना रणजित जाधव, पो.ना श्रीकृष्ण देशमुख, पो.कॉ विनोद पाटील, पो.कॉ ईश्वर पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.