TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बनावट कागदपत्रांसह शिक्षणाधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी

पाच जणांविरूध्द गुन्हा; जि. पच्या वरिष्ठ सहाय्यकाचा समावेश

vijay waghmare by vijay waghmare
January 24, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – बनावट कागदपत्रे, शिक्षणाधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी करून शासनाची ६ लाखांमध्ये आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार २२ जानेवारी रोजी उघडकीस आला आहे. याप्रकरणी इकरा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम अब्दुल मजीद सालार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात जळगाव शहर पोलिसांनी उपशिक्षक सय्यद अमरुल्लाह सय्यद चाँद कासार, त्यांचे वडील तथा संस्थेचे उपाध्यक्ष सय्यद चाँद सय्यद अमीर (दोन्ही रा. १०६, कोळीपेठ, मन्यारवाडा, जळगाव), तत्कालीन सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेख नईमोद्दीन शेख अफजलोद्दीन (रा. परकोट मोहल्ला, नशिराबाद), जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र रघुनाथ चौधरी (रा. संभाजीनगर, जळगाव) आणि भडगाव उर्दू शाळेचे उपशिक्षक शेख जहीर शेख सलाऊद्दीन (रा. शिवाजीनगर, जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

असा उघड झाला प्रकार फिर्यादीनुसार, अंजुमन-ए-तालिमुल मुस्लेमीन या संस्थेच्या घटनेनुसार पदाधिकारी आणि त्यांचे जवळचे नातेवाईक त्याच संस्थेत नोकरीवर असू शकत नाहीत. मात्र उपाध्यक्ष सय्यद चाँद कासार यांनी पदाचा दुरुपयोग करून आपला मुलगा सय्यद अमरुल्लाह याला २०१८ मध्ये शिक्षक म्हणून नियुक्त केले. या नियुक्तीचा मूळ प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रलंबित असताना संशयित आरोपींनी संगनमत करून तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट सही असलेला आदेश तयार केला.

न्यायालय आणि प्रशासनाची दिशाभूल या बनावट आदेशाच्या आधारे संशयित आरोपींनी विनाअनुदानित वरून अनुदानित तत्त्वावर मान्यता मिळवली आणि ‘शालार्थ वेतन प्रणाली’ मध्ये नाव समाविष्ट केले. इतकेच नव्हे तर, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून बनावट कागदपत्रांद्वारे न्यायालयाचीही दिशाभूल केली. याद्वारे शासनाकडून थकीत वेतनाचे ६ लाख २३ हजार ९७० रुपये आणि त्यानंतरचे नियमित वेतन असे एकूण लाखो रुपये लाटून शासनाची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

आधुनिक कृषी तंत्रज्ञान नव्या भारताच्या विकासाचा मार्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पहाटे रस्त्याकडेला व्यायाम करणाऱ्या तीन तरुणांना भरधाव वाहनाने चिरडले ; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी !

May 21, 2023

निंभोरा येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रम संपन्न

November 15, 2020

पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता? ; जाणून घ्या..आजचे इंधनाचे दर

May 23, 2022

इनरव्हील क्लबच्या गरबा नाईट मध्ये रंगल्या महिला !

October 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group