मेष : समाजाता तुमची चांगली कीर्ती वाढेल. काही विशेष सन्मान तुम्हाला मिळतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. आज तुम्हाला व्यवसायात सकारात्मक बदल दिसतील. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक कामास विलंब लागण्याची शक्यता आहे.
वृषभ : कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लान कराल. जिद्द वाढणार आहे. मनोबलाच्या जोरावर कामे यशस्वी कराल. आत्मविश्वासपूर्वक वागाल. आज तुमचे लक्ष व्यवसायातील नवीन योजनांकडे असेल. ज्यावर तुम्ही पूर्ण लक्ष द्याल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. चिकाटी वाढेल.
मिथुन : आरोग्याच्या समस्या उद्भवतील. यामुळे तुम्हाला धावपळ करावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी कामात यश मिळेल. आज तुमचे कामामध्ये लक्ष लागणार नाही. एखादी मानसिक चिंता राहील. कामाचा ताण व दगदग जाणवेल. आजचा दिवस तुमच्यासाठी सर्जनशील असेल. प्रवास शक्यतो टाळावेत. आर्थिक कामास मात्र अनुकूलता लाभेल.
कर्क : व्यवसायाच्या क्षेत्रात आज तुम्ही कोणतेही काम कठोर परिश्रम आणि समर्पणाने कराल. ज्यातून लाभ होईल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. भागीदारीमध्ये फायदा होईल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. आज तुम्हाला कामात यश मिळेल. तुमची प्रशंसा होईल. चिकाटी वाढणार आहे. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल.
सिंह : विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी थोडा वेळ काढावा लागेल. कामाच्या ठिकाणी रागावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक कामात वेळ वाया जात असल्याने तुमची चिडचिड होणार आहे. प्रवासात व वाहने चालवताना काळजी घ्यावी. आज कौटुंबिक व्यवसायात जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. एखाद्या मनाविरुद्ध घटनेला सामोरे जावे लागेल.
कन्या : पार्टनरशीपमध्ये व्यवसाय केल्यास नफा मिळेल. कुटुंबात शुभ कार्यक्रमाची चर्चा होईल. शेजाऱ्यांशी वाद घालणे टाळा. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांबरोबर सुसंवाद साधाल. आत्मविश्वास उत्तम राहील. आज कोणत्याही कामाशी संबंधित डिल फायनल केली तर भविष्यात मोठा फायदा होईल. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील.
तुळ : तुमची काम करण्याची योजना पूर्णत्वास येईल. मालमत्तेशी संबंधित वाद वरिष्ठांच्या मदतीने संपेल. तुमचे मन आनंदी राहील. आशावादीपणाने कार्यरत राहणार आहात. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आज वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामे यशस्वी होतील. प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे करू शकाल. प्रवासाचे योग येतील.
वृश्चिक : कुटुंबासोबत आनंदाने दिवस घालवाल. शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल. नोकरी – व्यवसायात काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रवास होणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. आज तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल. जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामे पूर्ण करू शकाल. चिकाटी वाढेल. अनपेक्षित प्रवास संभवतात.
धनु : कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. जवळच्या व्यक्तीला आर्थिक मदत कराल. व्यवसायात जोखीम घेतल्याने यश मिळेल. आर्थिक कामामध्ये सुयश लाभणार आहे. प्रवासाचे योग येणार आहेत. कौटुंबिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.आज तुम्हाला जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. काहींना गुप्त वार्ता समजतील. अपेक्षित पत्रव्यवहार होईल.
मकर : जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. पार्टनरशीपमध्ये फायदा मिळेल. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होतील. तुमचा प्रभाव वाढणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. चिकाटीने कार्यरत राहाल. प्रवासाचे योग येतील. कामाच्या दबावामुळे चिंतेत असाल. काम प्रामाणिकपणे करा, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल वाढेल.
कुंभ : वडिलांसोबत काही वाद असतील तर ते मिटतील. व्यवसायात एखादी डील फायनल होईल. त्यात घाई करु नका. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. काहींना नैराश्य जाणवेल. कामामध्ये चूक होण्याची शक्यता आहे. आज सामाजिक क्षेत्रात तुमची कीर्ती आणि सन्मान वाढेल. सावधनाता हवी. प्रवास नकोत. आर्थिक व्यवहार आज नकोत.
मीन : नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कुटुंबातील वाद संयमाने सोडवा. काही नवीन कामांचा विचार कराल. मित्र-मैत्रिणी भेटतील. नोकरीतील सहर्कायांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात आर्थिक लाभ होतील. मनोबल उत्तम राहील. आज तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर दिवस अनुकूल असेल. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. तुमचा बौद्धिक प्रभाव राहील.