जळगाव (प्रतिनिधी) निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक या पथकाने दि. ११ जुलै, २०२१ रोजी एस.एस.चौधरी ढाब्याच्या बाजुला चाळीसगाव-औरंगाबाद रोडवर, बोढरे फाटयाजवळ, सांगवी शिवार, चाळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी वाहन तपासणी कामी सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेले तसेच गोवा राज्यनिर्मित व विक्रीकरिता असलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक यांनी दिली आहे.
त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून गुन्हा रजिस्टर क्रमांक १६५/२०२१, दिनांक ११ जुलै, २०२१ रोजी परराज्यातील विदेशी मद्य – रॉयल ब्ल्यु माल्ट व्हिस्की १८० मि.ली. क्षमतेच्या ६०४८० बाटल्या (१२६० बॉक्स). इतर साहित्य- मद्यसाठा ठेवण्याकरिता बनवलेले ६ प्लायवुडचे बॉक्स. एक सॅमसंग कंपनीचा एन्ड्रॉइड मोबाइल व एक सॅमसंग कंपनीचा साधा मोबाइल गुन्हयाकामी वापरण्यात आलेला आहे. २ ताडपत्री. वाहन – टाटा मोटर्स लिमीटेट कंपनी निर्मित मॉडेल क्रमांक एलपीटी ३११८ टीसी ८X२ बी.एस.३ बारा चाकी ट्रक जिचा प्रादेशिक परिवहन क्रमांक MP-०९-HG-९३५४. जप्त मुद्येमालाची किंमत १ कोटी ३ लाख १ हजार २०० इतकी एवढी आहे. आरोपीचे नांव- अजय कन्हैयालाल यादव, वय-४१ वर्षे, राहणार ४५/८ जवाहर मार्ग, प्रेमसुख सिनेमाजवळ, इंदौर, मध्य प्रदेश-४५२००७ असे आहे.
या पथक मोहिमेत कांतीलाल उमाप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई. श्रीमती उषा वर्मा, संचालक (अं.व.द.) महाराष्ट्र राज्य, मुंबई. अर्जुन ओहोळ, विभागीय उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक. श्रीमती सिमा झांबरे, अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथक मोहिम राबविण्यात आली.
ही कायर्वाही विभागीय भरारी पथकाचे निरिक्षक सी.एच.पाटील, दुय्यम निरिक्षक एस.एस.रावते, ए.डी.पाटील, जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, युवराज रतवेकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या कार्यवाहीकरिता चाळीसगाव येथील निरिक्षक के.डी.पाटील, अमळनेर येथील दुय्यक निरिक्षक आर.पी.दांगट, मालेगाव येथील दुय्यक निरिक्षक आर.टी.खैरे, जवान महेंद्र बोरसे, अण्णा बाहिरम, संजय सोनवणे, शशिकांत पाटील यांनी मदत केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सी.एच.पाटील, निरिक्षक, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक हे करीत आहे.
अवैद्य मद्य निर्मीती, विक्री, वाहतुक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३३ व व्हॉटस् ॲप क्रमांक ८४२२००११३३ तसेच दुरध्वनी क्रमांक ०२५३-२३१९७४४ वर संपर्क साधावा. असे आवाहन निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.