TheClearNews.Com
Monday, July 14, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पारोळा तालुक्यातील 42 गावे देणार मंत्री अनिल पाटलांनाच साथ- कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास

असंख्य गावात झाला विकासात्मक बदल, बोरीवर बंधाऱ्यांची मालिका ठरली जलसंजीवनी

vijay waghmare by vijay waghmare
November 9, 2024
in अमळनेर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर- विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील सुमारे 42 गावात भरगच्च विकास कामांमुळे मंत्री अनिल पाटील यांनाच साथ मिळणार असा दावा या भागातील राष्ट्रवादी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यानी व्यक्त केला असून बोरी नदीवर बंधाऱ्यांची मालिकाच अनिल दादांनी अवतरविल्याने शेतकरी बांधवाना जलसंजीवनी मिळाली आहे.

यामुळे अनेक गावातील ग्रामस्थ देखील अमळनेर मतदरसंघांचे भूमिपुत्र म्हणून अनिल दादांचा अभिमान बाळगू लागले असल्याचे मा.जि.प सदस्य रोहिदास पाटील, दयाराम आण्णा पाटील (शेवगे), अशोक पाटील (अंबापिंप्री), शालिक पवार (हिवरखेडा सिम), चंद्रकांत दामोदर पाटील (बहादरपुर), सुनिल काटे (कोळपिंप्री), निलेश पाटील (शिरसोदे) यांनी सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती देतांना त्यांनी सांगितले की अमळनेर विधानसभा मतदासंघातील ही 42 गावे म्हणजे कृषी क्रांतीचे क्षेत्रच,प्रामुख्याने हा देखील
अवर्षणप्रवण भाग असताना येथील भूमिपुत्रांनी शेतीची गोडी काही सोडली नाही.केवळ पावसाळ्यात प्रवाहित होणाऱ्या बोरी नदीच्या सहाऱ्यावर आणि वरून राजा देईल तेवढ्या पाण्यावर राब राब राबून काळ्या मातीतून सोने उगविन्याचा विक्रम येथील बळीराजाने सुरवातीला केला आहे. 2019 साली झालेली विधानसभा निवडणूक येथील बळीराजा साठी वरदान ठरली, त्या निवडणुकीत भूमिपुत्र अनिल दादाच्या पारड्यात प्रत्येक गावातून मतदानाचा जणू काही आशीर्वाद रुपी पाऊसच पडला. अनिल दादाने देखील पाच वर्षात या 42 गावांना कधीही अंतर दिले नाही, गाव तेथे विकास काम हेच सूत्र अवलंबविले. येथे खऱ्या अर्थाने उणीव होती ती सिंचन क्षमतेची आणि हीच सिंचन क्षमता वाढवून दाखविण्याचे काम अनिल दादांनी केले.बोरी नदीवर पुंनगाव, भिलाली, हिवरखेडा आणि भिलाली आदी गावाजवळ साठवण बंधारे निर्माण केल्याने वाहून जाणारे पाणी अडविले जाऊन हजारों हेक्टर शेतीला पाण्यामुळे जीवदान मिळाले, अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना जिवंत होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. सुरवातीला केवळ पावसाळ्याच्या दोनचं महिने प्रवाहित दिसणारी ही नदी आता थेट जानेवारी फेब्रुवारी पर्यंत नदीत डोळ्यांना पाणी दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी कमी नक्कीच कमी झाले आहे. विकास काय असतो तो भूमिपुत्रांनेच दाखविला आहे. दुसरे मोठे काम त्यांनी मार्गी लावले ते म्हणजे जानवे, सुमठाने, जिराळी, इंधवे, बहादरपुर, महाळपुर,शेवगे आणि बोदर्डे या गावांना स्पर्शून जाणारा जानवे ते पारोळा रस्ता. तब्बल 107 कोटी खर्चून हा 25 किमी अंतराचा नवीन रस्ता तयार होणार असून याची वर्क ऑर्डर देखील झाल्याने लवकरच याचे निर्माण होणार आहे. अनेक गावांना जोडणारा आणि दळणवळनाला मोठी गती देणारा हा रस्ता ठरणार आहे. तसेच मोंढाळे ते बहादरपुर रस्त्यांचे डांबरीकरण , शेवगे ते पुंनगाव रस्ता, किंवा गावोगावी रस्त्यांचे निर्माण, अनेक तांडा वस्ती स्वच्छ व सुंदर करणे असेल, गावोगावी मूलभूत सुविधा वाढविणे. गावोगावी नवीन पाणीपुरवठा योजना निर्माण करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे असे अनेक कामे मार्गी लावून इतिहासात नोंद होईल अशी कामे अनिल दादांनी करून दाखविली आहेत.
गावोगावी अनिल दादांनी दिलेल्या निधीचा विचार करता अंबापिंप्री येथे साठवण बंधारे धरून सुमारे चार कोटी निधी मंजूर करून आणला असून यात काही निविदा प्रलंबित आहेत. इंधवे येथे पावणे दोन कोटी, कांकराज येथे 72 लक्ष, कोळपिप्री येथे 1 कोटी 40 लक्ष या व्यतिरिक्त दीड कोटीचे दोन बंधारे देखील येथे मंजूर आहेत तसेच खेडीढोक येथे 20 लक्ष,चीख 35 लक्ष,चीखलोद खुर्द व बुद्रुक येथे 35 लक्ष,जिराळीत 50 लक्ष, दगडी सब गव्हाण 67 लक्ष, दबापिंप्री 23लक्ष, दळवेल 90 लक्ष येथेही सुमारे तीन कोटी निधी सिमेंट साठवण बंधर्यासाठी मंजूर आहेत. दहीगाव 13 लक्ष, धाबे 53 लक्ष, नेरपाट 22 लक्ष, पिंपळकोठा 1कोटी 33 लक्ष, पिंपळभैरव 15 लक्ष, शिरसोदे येथे अडीच कोटींच्या दोन बंधाऱ्या सह इतर कामांसाठी 55 लक्ष,पाणी पुरवठा योजनेसाठी सव्वा कोटी, बहादरपूर 80 लक्ष या व्यतिरिक्त एक कोटींचे दोन बंधारे मंजूर आहेत. याच पद्धतीने भिलाली, बोदर्डे, भोकरबारी, भोलाने, महाळपूर, मोहाडी, रत्नापिप्री, राजवड, वंजारी, वडगाव, वसंतनगर व तांडा, शेळावे बुद्रुक व खुर्द, शेवगे बुद्रुक व खुर्द, सबगव्हण बुद्रुक व खुर्द, सुमठाणे, हिरापुर, हिवरखेडा, होळपिप्री आदी गावांना भरघोस निधी देऊन यातून बंधारे, काँक्रीटीकरण, सभामंडप, ग्रामपंचायत इमारत, स्मशान भूमी, सुशोभीकरण, डांबरीकरण, समाज मंदिर, आर ओ प्लांट, पेव्हर ब्लॉक, सामाजिक सभागृह, सरक्षन भिंत यासारखी कामे मार्गी लागून गावोगावी मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे आदिवासी भिल वस्ती असेल, मागास वर्गीय वस्ती असेल, कींवा तांडा वस्ती असेल अनिल दादाने प्रत्येकाला न्यायचं दिला आहे.
यामुळे अनिल दादा म्हणजेच विकासाची नांदी हे प्रत्येकाच्या लक्षात येऊ लागले असून गावोगावी अनिल दादाचं पुन्हा,,,असाच सुर निघत असल्याचे महायुतीच्या कार्यकर्त्यानी म्हटले आहे.

READ ALSO

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. नितीन पाटील यांचा भाजपात प्रवेश !

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी भाग्यश्री ठाकरे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. नितीन पाटील यांचा भाजपात प्रवेश !

July 12, 2025
जळगाव

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी भाग्यश्री ठाकरे

July 4, 2025
जळगाव

निवडणुकांसाठी अजित पवार गटाची मोर्चेबांधणी ; प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे उद्या जिल्ह्यात

July 2, 2025
अमळनेर

अमळनेर तालुक्यातील 11 कृषी केंद्रांची झाडाझडती

July 1, 2025
जळगाव

महानगरपालिका निवडणुका आता नोव्हेंबरमध्येच

June 24, 2025
अमळनेर

आधी रुग्णसेवा, मग भाचीचे लग्न

June 16, 2025
Next Post

गांजा बाळगणाऱ्या सारबेट्याच्या दोघांना हेडावे गावाजवळ अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरकार दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल ; संजय राऊतांचे फडणवीसांना प्रतिउत्तर

March 9, 2022

Karnataka Exit Poll 2023 : जाणून घ्या…कर्नाटक निवडणुकीचा एक्झिट पोल काय सांगतोय?

May 10, 2023

‘मविआ’ला मोठा झटका ; देशमुख आणि मलिकांना मतदानाची परवानगी कोर्टाने नाकारली

June 9, 2022

“किरीट सोमय्या दहशतवादी, बलात्कारी की दरोडेखोर” ; चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

September 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group