शिमला (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेते आणि भाजपचे खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण झाली आहे. हिमाचल प्रदेशातील आरोग्य सचिवांनी याबाबतची माहिती दिली. सनी देओल हे पंजाबच्या गुरुदासपूर या मतदारसंघाचे भाजप खासदार आहेत.
हिमाचल प्रदेशातील आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी देओल खासगी कामानिमित्त हिमाचल प्रदेशात आले होते. ते कुलू जिल्ह्यातील मनालीजवळ एका फॉर्म हाऊसमध्ये थांबले होते. काही दिवसांपूर्वी सनी देओल यांच्या खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर आराम करण्यासाठी ते मनालीतील फॉर्म हाऊसमध्ये आले होते. ते गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी राहत होते. उद्या ३ डिसेंबरला सनी देओल हे एका मित्रासोबत मुंबईत परतणार होते. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सनी देओलने भाजपात प्रवेश केला. त्याला पंजाबमधील गुरदासपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. हा मतदारसंघ नेहमीच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे.
हिमाचल प्रदेशात कोविड-१९ चे ७०९ नवीन केसेस समोर आल्यानंतर आता आकडा ४१,२२८ वर पोहोचला आहे. राज्यात मंगळवारी कोरोनामुळं २१ लोकांचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्ये आतापर्यंत कोरोनामुळं मृत झालेल्यांची संख्या ६५७ झाली आहे.