मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरूवारी सकाळी निधन झालं. आत्ता सिद्धार्थचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. मात्र या रिपोर्टमध्ये सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. डॉक्टरांनी रिपोर्टमध्ये त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्टपणे नमूद केलेलं नाही.
सिद्धार्थ शुक्ल्याच्या अकाली निधनामुळे चाहत्यांना आणि त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. केमिकल एनालिसिस आणि हिस्टोपॅथोलॉजी रिपोर्टसाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. या दोन रिपोर्टमधून कळू शकेल मृत्यूचे कारण नेमकं काय आहे. प्राथमिकदृष्ट्या तरी अनैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याचे दिसत नसल्याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये देण्यात आले आहे.
सिद्धार्थ शुक्लाने बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी एक गोळी घेतली होती. ती गोळी नेमकी कशासंदर्भात होती. याबद्दल कोणती माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे केमिकल एनालिसिस व हिस्टोपॅथोलॉजी रिपोर्टमध्ये समजू शकेल की विष किंवा ड्रग्ज घेतले होते का ते? यामधून समोर येईल.