जळगाव (प्रतिनिधी) जि.प शिक्षण विभागातर्फे दरवर्षी शिक्षक दिनी अर्थात ५ सप्टेबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक अशा १५ शिक्षकांना आदर्श पुरस्कार दिले जात असतात. विभागीय आयुक्तांकडून पुरस्कारार्थीच्या यादीस मान्यता मिळाली असुन १५ शिक्षकांची नावे जाहिर करण्यात आली आहे. आज दि.५ रोजी पुरस्कार वितरण सोहळा सकाळी ११ वाजता गंधे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
जि.पने आदर्श शिक्षकांसाठी जि.पचे सीईओ श्री अंकित यांच्यासह प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्यासह समितीने मुलाखती घेवून विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी शिक्षकांची यादी पाठविली होती. त्यास मान्यता मिळाली आहे. यावर्षी १५ पुरस्कारामध्ये ३ महिला शिक्षकांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्याभरातून यंदा २३ शिक्षकांचे अर्ज प्राप्त झाले होते.
तिन्ही मंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती शिक्षक पुरस्कार वितरण !
या कार्यक्रमास पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, मदत व पुर्नवसन मंत्री ना. अनिल पाटील, खा. रक्षा खडसे,खा.उन्मेष पाटील, तसेच जिल्हयातील सर्व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, शिक्षक आमदार, पदविधर आमदार, महापौर मनपा, जळगाव यासह जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद मुख्यकार्यकारी अधिकारी श्री अंकित, पोलीस अधीक्षक एम राजकुमार व जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसह जि.पचे सर्व विभाग प्रमुख आदींच्या उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे.
तालुकानिहाय जाहिर झालेले पुरस्कार !
अमळनेर : गजानन रमण चौधरी (जि.प शाळा, ढेकुसिम), भडगाव : गणेश व्यंकट पाटील (जि.प शाळा अचळगाव), भुसावळ : रिजवानखान अजमलखान (जि.प उर्दु शाळा कुन्हे), बोदवड : महेंद्रसिंग शिवराजसिंग पाटील (जि.प शाळा नाडगाव), चाळीसगाव : श्रीमती शुभांगी एकनाथराव सोनवणे (जि.प शाळा न्हावे), चोपडाः किशोर बाळाराम पाटील (जि.प शाळा देवगाव), धरणगाव : विजय काशिनाथ बागुल (जि.प शाळा वराड बु), एरंडोल : गणेश सुखदेव महाजन (जि.प शाळा, टाकरखेडा), जळगाव : श्रीमती ज्योती सतीश तडके (जि.प शाळा नांद्रे बु), जामनेर : कैलास समाधान पाटील (जि.प शाळा, सोनारी), मुक्ताईनगर : धनलाल वसंत भोई ( जि. प केंद्रीय शाळा १ मुक्ताईनगर), पाचोरा : श्रीमती विजया भालचंद्र पाटील (जि. प केंद्रीय शाळा बाळद), पारोळा : श्रीमती अलका बाबुलाल चौधरी (जि.प शाळा बोळे), रावेर : जितेंद्र रमेश गवळी (जि.प शाळा पुनखेडा), यावल अतुल रमेश चौधरी (जि.प मराठी मुलींची शाळा सांगवी बु.)