सांगली (वृत्तसंस्था) पतीला जेवणाच्या डब्यातील खाद्य पदार्थात विषारी औषध घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. एकदा जेवणाच्या डब्यात, तर दुसऱ्यांदा चहामध्ये फिनेल घातले. तिसऱ्या वेळी गुलाबजाममध्ये उंदीर मारण्याचे औषध घातले होते. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील गौरी प्रसन्ना खंकाळे हिच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गौरी हिला पोलिसांनी अटक केली.
17 मार्चला गौरी प्रसन्न खंकाळे हिने पती प्रसन्न यांच्या जेवणाच्या डब्यात फिनेल घातले होते. त्यानंतर चार दिवसांनी पुन्हा चहामध्ये फिनेल घातले. त्यानंतर सोमवारी चार तारखेला गौरीने सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास प्रसन्न यांना गुलाबजाम खायला दिले. प्रसन्न यांना त्यात बुरशीच्या औषधाचे तुकडे दिसले. बायकोने गुलाबजामुन खाण्याचा खूपच आग्रह धरला. त्यावरुन प्रसन्न यांना शंका आली. त्यांनी ते खाल्ले नाहीत.
गुलाबजामुन मधून उंदीर मारण्याचे औषध घालण्यात आले होते. त्यावर त्यांनी तिला हे काय आहे, असं खडसावून विचारलं. तेव्हा बायकोने चुकीची कबुली देत माझी चूक झाली, माफ करा, मी पुन्हा असे करणार नाही, असे सांगितले. त्यावरुन हा प्रकार उघडकीस आला. यानुसार तिच्यावर कलम 307 आणि 328 नुसार इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील गौरी प्रसन्ना खंकाळे हिच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पती प्रसन्न खंकाळे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर पत्नी गौरी हिला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.