जळगाव (प्रतिनिधी) तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना सोमवारी न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
मविप्र संस्थेतील दाखल गुन्ह्यांमध्ये संशयित नीलेश भोईटे यांच्या घराची झडती घेण्यापूर्वी घरात रक्ताने माखलेला सुरा ठेवून पुणे पोलिसांना मिळून येईल, असा कट रचल्याच्या दाखल गुन्ह्यात तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना सोमवारी न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. अॅड. प्रवीण चव्हाण २७ फेब्रुवारीपासून कारागृहात होते. न्यायाधीश वावरे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. गेल्या आठवड्यात अपूर्ण राहिलेला जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांचा युक्तिवाद सोमवारी सकाळी पूर्ण झाला. त्यानंतर सायंकाळी जामीन मंजूर करण्यात आला.