जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील चाळीसगाव येथील रहिवासी असलेले अॅड.सचिन उर्फ समीर पवार यांची नुकतेच सामाजिक कल्याण व मानव संरक्षण संघाच्या राज्य अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती झाली आहे.
देशभरात विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आणि मानव अधिकार संरक्षणाच्या दृष्टीने कार्य करणाऱ्या सामाजिक कल्याण व मानव संरक्षण संघाची राज्य पदाधिकारी निवड नुकतेच जाहीर झाली. चाळीसगाव येथील रहिवासी असलेले अॅड.सचिन (समीर) पवार यांची महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिने अभिनेते सामाजिक संरक्षण विभाग राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार कनोजिया, राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.
माजी निवड सार्थ ठरवीत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. मानव अधिकार आणि हक्कांचे संरक्षण करण्याच्या हेतूने मी कार्यरत राहील, असा विश्वास अॅड.सचिन पवार यांनी व्यक्त केला. पवार नियुक्तीबद्दल राज चौधरी, संतोष श्रीगिरी, नचिकेत कोठवले, राजीब राज, शशिकांत दुबे, संतोष आल्हाट, अभिजीत कुंभका, प्रेमसिंग पवार यांच्यासह मित्र परिवार, नातेवाईक यांनी अभिनंदन केले आहे.