जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्व वकिलांना कोरोना लस देण्यात यावी, अशी मागणी जळगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिव अँड. कुणाल पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, जळगाव जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती आपण उत्तम प्रकारे हाताळता आहेत. बऱ्याच प्रमाणात लसीकरण सुरू आहे. कलच जळगावातील बारमध्ये न्यायालयाच्या कर्मचारी संघटनेला लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. त्यात कर्मचारी व कुटुंबियांना तसेच काही जेष्ठ वकिलांना लसीकरण उत्तमप्रकारे सुरु आहे. पण त्यात एक महत्त्वाचा भाग म्हणजे जूनियर अँडव्होकेट यांच्या वर त्यांच्या परिवाराची तेवढीच जबाबदारी आहे. शिवाय कुठलाही पगार किंवा कोणत्याही बँकमधून सोय होत नाही. अतिशय गंभीर परिस्थितीमधून वकील बांधव जात आहे. त्यामुळे आमच्या जूनियर वकिलासाठी जर लसीचे डोस उपलब्ध करून द्यावी. किंवा एखाद्या डॉक्टरांकडे तशी सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निवेदनात म्हंटले आहे.