चोपडा (लतीश जैन) नुकतेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे विविध विकास कामांच्या उद्घाटन झाले . या विकास कामांच्या उद्घाटनाला असंख्य लोक उपस्थित होते. यावरून माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या कामाच्या धडाका पाहून उस्फूर्तपणे गर्दी जमली असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरु होती. दरम्यान, यामुळे तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
विशेष म्हणजे या गर्दीत फक्त शिवसेनेचेच नव्हे तर सर्वपक्षीय लोकांची गर्दी असल्याने माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व आमदार लताताई सोनवणे यांची लोकप्रियता वाढत असल्याचीही चर्चा सुरु होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध उद्घाटनाच्या पत्रिकेवर भाजपाचे रोहित निकम, राष्ट्रवादीचे घनश्याम अग्रवाल यांच्या फोटो होता. मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी व कांग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष ऍड. संदीप भैय्या पाटील यांच्या फोटो व साधे नामोल्लेखही कुठेही दिसला नाही.
कृषी उपन्न बाजार समितीत सभापती नरेन्द्र पाटील हे शिवसेनेचे असले तरी राष्ट्रवादी व कांग्रेस पाठिंबा घेत सभापती झाले आहेत. मात्र, तरीही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी,माजी आमदार कैलास बापू पाटील तसेच इतर व कांग्रेसच्या नेत्याचा फोटो व कुठेही नाव देखिल नसल्याने या दोघ नेत्यांचे समर्थक येणार नाही असे लोकांना वाटत होते. मात्र. त्याउलट झाले. राष्ट्रवादीचे समर्थक व अरुणभाई गुजराथी यांचे काही खंदे समर्थक संचालक मंडळातील काही सदस्य स्टेजवर दिसून आल्याने अनेक जण चकीत झाले होते. मात्र कांग्रेसचे ऍड.संदीप भैय्या पाटील हे स्वतः व त्यांचे संचालक अनुऊपस्थित दिसले व कांग्रेसचे कार्यकर्तेही दिसून आले नाहीत.
माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांची ताकद वाढली असून सर्वपक्षीय मंडळी आल्याने तर आगामी निवडणूक नगरपालिकाची असो की, विधानसभेची माजी आमदार चंद्रकांत अण्णाचे पारडे जड राहील असे लोकांमध्ये बोलले जात होते. राष्ट्रवादीचे काही संचालक अरुणभाईचे खंदे समर्थक आहेत. काहीही असले तरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकास कामाच्या उद्घाटनला कार्यक्रमात हे लोक येणारच नाहीत, असे चित्र पहिल्या दिवसापर्यंत वाटत होते. परंतु स्टेजवर हे संचालक दिसल्याने लोकांच्या संभ्रम वाढला होता. यावरून माजी आमदार सोनवणे यांच्या कामाचा धडाका व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यावर असलेली पकड किती मजबूत आहे, हे देखील दिसून आले. त्यामुळे आज तरी याच्या फायदा शिवसेनेला दिसत आहे.
एका वर्षापूर्वी राष्ट्रवादीत फक्त इन्कमिंग दिसत असल्याने महाराष्ट्र राज्यात कोणाचेही सरकार येऊ द्या. परंतु चोपडा तालुक्यात राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही असे म्हटले जात होते परंतु जितक्या जोराने इनकमिंग झाली तितक्याच जोराने राष्ट्रवादीत ताटातूट दिसून येत आहे. विकासाच्या नावावर माजी आमदार चंद्रकांत सोनवणे हे आगामी निवडणूक लढवणार असून यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या उमेदवार किती तक धरतो ? हे काळ वेळच ठरवेल.
एकंदरीत माजी आमदार चंद्रकांत सोनवणे समोर कोणताही उमेदवार दिल्यास तो निवडून येण्यासाठी अथक परिश्रम व गटातटाचे राजकारणाला तिलांजली द्यावी लागेल आणि माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी खेडोपाडी केलेल्या रस्त्यांचे व इतर विकास कामांचे कौतुक मोठ्या प्रमाणावर लोकं करत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीत मतभेद असल्याने पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपला मार्ग सोयनुसार निवडून घेतल्याची चर्चा आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या नामोल्लेख नसताना देखील त्यांचे संचालक मंडळातील खंदे समर्थक हे हजर राहिल्याने अरुणभाई गुजराथी यांच्या गटात सुद्धा तीव्र नाराजी दिसत होती. मात्र जनतेत राष्ट्रवादीच्या बाबतीत तर्कवितर्क सुरू दिसले. दरम्यान, असेच चालले तर आगामी कोणतीही निवडणूक जिंकणे कठीण होऊ शकते हे निश्चितच….!