अहमदनगर (वृत्तसंस्था) अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. जिल्हा रुग्णालयातील आयसीयू रुग्णालयात ही आग लागली असून ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तण्यात जात आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले.
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्यानं सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आगीत काही रुग्ण भाजल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. रुग्णालयात अग्निशमन दल पोहोचले असून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रुग्णालयाला लागलेल्या आगीत अनेक जण भाजले असल्याची शक्यता असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रुग्णालयाच्या आयसीयूला आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं. रुग्णालयाच्या तळमजल्यावर हीआग लागली.
ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याची माहिती मिळू शकलेली नाहीये. आयसीयू वॉर्डात लागलेल्या या आगीने अवघ्या काही क्षणात संपूर्ण वॉर्डला आपल्या विळख्यात घेतले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहेत. तसेच मदत आणि बचावकार्यही मोठ्या वेगाने सुरू आहे. जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत २० जणांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे. आयसीआयूला लागलेल्या आगीत १२ ते १५ जण जखमी झाले असून सहा जणांचा मृत्यू झाल्याची सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, आयसीयूला आग लागल्याचं समजताच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तातडीने कोल्हापूरवरुन रवाना झाले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. मृताचा अद्याप आकडा समोर आलेला नाही. प्रत्येक्षात गेल्यानंतर पाहणी करणार असल्याचं ते म्हणाले. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.