धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी आज रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पिकांची पाहणी करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे ग्वाही दिली.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांमध्ये नुकसानग्रस्त पिकांची पाहणीचा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.त्या पार्श्वभूमीवर २२ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास धरणगाव परिसरातील अवकाळी पावसामुळे खराब झालेल्या पिकांची पाहणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.यावेळी लवकरात लवकर पंचनामे करून जास्त जास्त नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, विजय महाजन, रवी महाजन धीरेंद्र पूर्भे, बुट्या पाटील, संतोष महाजन, पवन महाजन यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कृषी मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा वर कापूस फेकून केला निषेध !
कृषी मंत्री अब्दुल सत्तार धरणगाव शहरातून त्यांचा गाड्यांचा ताफा जात असताना ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, राजेंद्र ठाकरे, भागवत चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते रस्त्यावर गाडा गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच जोरजोरात घोषणा देऊन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या गाडीवर कापूस फेकून निषेध करण्यात आला. तसेच हातात खोके धरून जोरजोरात घोषणा देत होते. यावेळी धरणगाव पोलिसांनी हस्तक्षेप करून कृषी मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा शहरातून सुरळीतपणे जाऊ दिला.