कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) कोकण व पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पूरग्रस्तांसाठी कासोदा ग्रामस्थ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मदत फेरी काढण्यात आली.
याप्रसंगी १६ हजार रुपये रोख, एक साडी, तीन ड्रेस इत्यादी वस्तू जमा करून दिल्यात याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिम्मत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महानंदा ताई पाटील, राजाभाऊ मंत्री पतसंस्थेचे चेअरमन पांडुरंग वाणी, व्यवस्थापक व माजी सरपंच संजय नवाल, ग्रामपंचायत सदस्य शेख अब्दुल अजिज बारी , मुश्रीफ पठाण, स्वप्नील बियाणी, शैलेश पांडे, उमेश नवाल ,कैलास अग्रवाल, बुलढाणा अर्बन बँकेचे व्यवस्थापक अनिल सोळंके, सुभाष चौधरी, अँड. वसंत पाटील, जगन्नाथ सोनवणे, मधुकर ठाकूर तसेच मराठी पत्रकार संघातर्फे एरंडोल तालुका अध्यक्ष संजय चौधरी, तालुका कार्याध्यक्ष जितेंद्र ठाकरे, केदारनाथ सोमानी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सागर शेलार, तालुका प्रसिद्धीप्रमुख प्रशांत सोनार, शहराध्यक्ष सुरेश ठाकरे, राहुल शिंपी इत्यादी उपस्थित होते.