जळगाव (प्रतिनिधी) जगात अत्यंत महत्वाचे मानले गेलेले अंजिठा आपल्या सगळ्यांनाच अभिमान व सांस्कृतिक परंपरा असलेले असताना आपण समाज म्हणून, चित्रकार म्हणून , कलावंत म्हणून, शासन म्हणून आपण अंजिठ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे. अंजिठा लेणीचा आधुनिक काळात शोध लागून २०० वर्ष झाली. या द्विशतकपुर्तीचा उत्सव कोठेही साजरा केला नाही याची खंत मनात आहे. अशी भावना प्रा. राजू महाजन यांनी आज व्यक्त केली.
परिवर्तनच्या दशकापूर्ती निमित्ताने खान्देशातील चित्रकारांनी समर्पित केलेल्या शोध प्रदर्शनात आज ‘अजिंठ्यातील चित्रकला, इतिहास आणि वास्तव’ याविषयावर प्राचार्य राजू महाजन यांचे व्याख्यान पु. ना. गाडगीळ आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी राज शिंगे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमास परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील, नारायण बाविस्कर, चित्रकार राजू बाविस्कर, विजय जैन, विकास मलारा, शाम कामावत, सुशील चौधरी, निरंजन शेलार, यशवंत गरूड, नितीन सोनवणे आदी उपस्थित होते. शोध प्रदर्शन दि. २८ पर्यंत सुरू असणार आहे. रसिकांनी पहाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.