मुंबई प्रतिनिधी । कोरोनाचा प्रसार रोखण्यास केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी वेळोवेळी केला. रुग्णांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा तसेच अनियोजित लॉकडाऊन ह्यावर त्यांनी वेळोवेळी टीका केली. काँग्रेस मधून फक्त राहुल गांधीच केंद्र सरकार वर टीका करताना दिसतात.
देशातील करोना रुग्णसंख्या प्रचंड वेगानं वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून लाखाच्या जवळपास लोक दिवसाला करोना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या वाढण्याचा वेगही झपाट्यानं वाढत आहे. देशातील करोनाच्या वाढत्या प्रसारावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “अनियोजित लॉकडाउन ही एका अंहकारी व्यक्तीची देणं आहे. ज्यामुळे करोना देशभरात पसरला,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी देशात करोनाचा शिरकाव होण्याआधीपासूनच सरकारला लक्ष्य करत आहे. करोनाच्या धोक्याविषयीही त्यांनी फेब्रुवारीमध्येच इशारा दिला होता. त्यानंतर ते सातत्यानं व्हिडीओ आणि ट्विटच्या माध्यमातून प्रश्न विचारून मोदी सरकारला घेरण्याचा प्रश्न विचारत आहेत.