TheClearNews.Com
Thursday, May 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

vijay waghmare by vijay waghmare
April 27, 2026
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्याच्या राजकारणात अडीच वर्षांनंतर शिवसेना शिंदे गटाकडून मंत्रीमंडळात बदल केले जातील असे सुतोवाच शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी नुकतेच केले. त्यानंतर अवघ्या दुसऱ्या दिवशीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वर्चस्व मिळविण्यासाठी शिवसेना नेत्यांना विविध जिल्हयाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव व नंदुरबार जिल्हयाची धुरा सोपविण्यात आली आहे. अर्थातच सर्वसामान्य माणसांशी नाळ जुळलेल्या तसेच कामाचा माणूस म्हणून ओळख असलेले शिवसेनेच्या शिंदे गटातील ज्येष्ठ नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील या ‘फायरब्रेण्ड’ नेत्याचे पक्षश्रेष्ठींनी एकप्रकारे राजकीय वजन वाढविले पण त्याच बरोबर त्यांचे मंत्रीमंडळातील स्थान देखील भक्कम केले आहे.

पाचोऱ्याचे आ. किशोर पाटील यांनी अलीकडेच मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्याने आणि त्यांना मंत्रिपद मिळावे म्हणून त्यांच्या समर्थकांनी केलेल्या मागणीमुळे ना. गुलाबराव पाटलांच्या पदावर गदा येणार का, अशी चर्चा रंगली होती. परंतु, गुलाबराव पाटलांनी यावर प्रतिक्रिया देताना चेंडू पक्षश्रेष्ठींकडे टोलवला असला, तरी त्यांचे दिल्ली आणि मुंबईतील वजन पाहता ते मंत्रिमंडळात कायम राहतील, असेच चित्र दिसत आहे.

READ ALSO

फोटो अन् संवादाची क्लिप व्हायरलची धमकी देत विद्यार्थीनीकडे केली शरिरसुखाची मागणी

खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

जळगावमधील वर्चस्व आणि ‘फायरबॅण्ड’ प्रतिमा

मंत्री गुलाबराव पाटील हे केवळ जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीच नाहीत, तर उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचा (शिंदे गट) एक आक्रमक आणि प्रभावी चेहरा आहेत. त्यांच्या गावरान शैलीतील भाषणांमुळे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेल्या थेट संपर्कामुळे ते पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. उत्तर महाराष्ट्रात त्यांचे निर्विवाद वर्चस्व असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा आक्रमक नेत्याला डच्चू देणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी
राजकीयदृष्ट्या जोखमीचे ठरू शकते. पक्षश्रेष्ठींचा विश्वास आणि कामगिरीचे ऑडिट नुकत्याच झालेल्या चर्चेनुसार, मंत्र्यांच्या कामगिरीचे ‘ऑडिट’ होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, गुलाबराव पाटील यांनी राबवलेल्या पाणीपुरवठा योजना आणि जलजीवन मिशनमधील कामांमुळे त्यांना सकारात्मक गुण मिळण्याची शक्यता आहे. त्यातच शिंदे गटात प्रभावी नेत्यांपैकी ‘टॉप’चे नेते म्हणून त्यांची गणना केली जाते. शिंदे गटातील आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक असले तरी, गुलाबराव पाटलांचे स्थान अद्याप अबाधित असल्याचे संकेत मिळत आहेत. विषेश म्हणजे राज्यात सर्वाधिक डिपीडीसीचा निधी खर्च करण्यात गुलाबराव अव्वल आहे. जिल्हयातील आमदारांना निधी देण्यास देखील आकडेवारी पाहता दुजाभाव करतांना दिसत नाही त्यामुळे विरोधाला विरोध म्हणून काही जण कोपऱ्यात बोलतात पण प्रत्यक्षात त्यांना दिलेल्या निधीचे आकडे पाहता खरोखर ‘कामाचा माणूस’ असल्याचे स्पष्ट होते.

जिल्ह्यात युतीमध्ये समन्वय राज्यभरात अनेक ठिकाणी भाजप, शिंदे गट व अजित पवार गटात कुरबुरी आहे. मात्र जळगाव जिल्हयात भाजपा व शिंदे गटातील ‘गोडवा’ कायम ठेवण्यात गुलाबराव पाटलांना समन्वयाच्या भूमिकेतून यश आले आहे. तीन्ही पक्षातील नेत्यांशी त्यांचे असलेले ट्युनिंग आणि विकास कामांचा धडाका या त्यांच्या जमेच्या बाजू आहे.

जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये यश

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापुर्वी झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत त्यांची कामगीरी प्रभावी राहीली आहे. त्यांच्या ‘होमपीच’ धरणगावात त्यांना अपयश आले असले तरी पहिल्यांदाच येथे भाजपा सेनेत युती जुडवून आणली हे विषेश. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात प्रत्येक निवडणुकीत भाजपाने विरोधाची भुमिका घेतली आहे. युती तर कधी झाली नाही पण या नगरपालिका निवडणुकीत भाजप सोबत युती करीत धरणगाव् नगरपालिका एकत्र लढले हे विशेष. तत्पर्वी विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे गटाचे ५ आमदार निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहीला आहे. स्वताचा मतदार संघ सोडून मंत्री गुलाबराव पाटील यांच्य चोपडा, पारोळा, मुक्ताईनगर, पाचोर भडगाव या मतदार संघात सभा घेऊन वातावरण चांगलेच तापवले आणि य मतदारसंघावर भगवा फडकाविल आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचे राज्याच्या राजकारणात हात बळकट केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonParty leaders strengthen the ministerial position of 'Firebrand' Gulabrao Patil

Related Posts

गुन्हे

फोटो अन् संवादाची क्लिप व्हायरलची धमकी देत विद्यार्थीनीकडे केली शरिरसुखाची मागणी

May 21, 2026
जळगाव

खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

May 20, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

May 20, 2026
गुन्हे

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

May 19, 2026
गुन्हे

मद्याच्या नशेत रोखले पिस्तूल

May 19, 2026
धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
Next Post

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

July 8, 2021

केंद्र सरकारच्या विरोधात व्हाट्सअँपची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

May 26, 2021

125 तास रेकॉर्डिंग करु शकणाऱ्या फडणवीसांचं कौतुक करायला पाहिजे पण…शरद पवारांचे प्रत्त्युत्तर !

March 9, 2022

डॉ. मिलिंद बागुलांची ‘बाप’ कथा गोंडवाना विद्यापीठ अभ्यासक्रमात !

February 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group