मुंबई प्रतिनिधी | लोकसभेचं कामकाज मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. दुपारी ३ वाजल्यापासून राज्यसभेचं कामकाज सुरु होईल. ANI ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
विरोधकांनी सरकारच्या कामकाजावर काही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल असं आश्वासन लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांनी दिलं. करोनाकाळात आपण हे पावसाळी अधिवेशन घेतो आहोत. अशा वेळी देशातील परिस्थिती समजून घेत योग्य ते सहकार्य करावं असंही आवाहन ओम बिर्ला यांनी लोकसभेत केलं.