मुंबई (वृत्तसंस्था) हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल अनेक प्रश्नांना उत्तर देताना विरोधकांना खडेबोल सुनावले. मात्र आता यावरुनच भाजपाचे नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राजकारण सोडून शेती करणार होतात त्याचं काय झालं?, असा प्रश्न निलेश राणे यांनी अजित पवारांना विचारला आहे.
अजित पवार यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान केलेल्या एका वक्तव्याचा संदर्भ देत निलेश राणे यांनी अजित पवार यांना शेती करण्यासंदर्भातील त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली. “तीन पक्षांचे सरकार आले आणि हाता तोंडचा घास गेल्याने दु:ख झालंय अशं आज अजित पवार बोलले. अजित पवार साहेब तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये रडता, मोबाईल बंद करुन लपून बसता. बिन खात्याचे तीन महिने मंत्री राहण्याचा मानही तुमचाच. तुम्ही इतके दु:खात होतात की राजकारण सोडून शेती करणार होतात. त्याचं काय झालं?,” असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे. ३ पक्षाचे सरकार आले आणि हाता तोंडाचा घास गेल्याने दुःख झालंय असं आज अजित पवार बोलले. अजित पवार साहेब तुम्ही PC मध्ये रडता, मोबाईल बंद करून लपून बसता, बिन खात्याचे ३ महिने मंत्री राहण्याचा मान तुमचाच. तुम्ही इतके दुःखात होतात की राजकारण सोडून शेती करणार होतात त्याचं काय झालं??. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांना अश्रू अनावर झाल्याचे पहायला मिळालं. पत्रकार परिषदेत त्यांचा सूर मवाळ होता. एरवी सडेतोड आणि आक्रमकपणे उत्तर देणारे अजितदादा भावुक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. अजितदादांचे हे हळवे रूप महाराष्ट्राने पहिल्यांदाच बघितले. शरदरावांनी कुटुंबप्रमुख म्हणून चार गोष्टी सुनावल्यामुळेच अजितदादांना नरमाईची भूमिका घेत २९ सप्टेंबरला पुन्हा मुंबई गाठली. त्यानंतर या राजीनामा प्रकरणावर पडदा पडला.
















