जामनेर (प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगट्टीवार, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील व माझी आता आमदारकीच्या सहा टर्म झाल्या आहेत. पक्षाने जर उमेदवारी दिली नाही तर आम्हाला चित्रपटात भूमिका दया, अशी मागणी भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी एका चित्रपट निर्मात्याकडे केली.
जामनेर येथे ‘हलगट’ या सिनेमाच्या पोस्टरचे प्रमोशन माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. अजित पवार, सुधीर मुनगंट्टीवार, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि माझी आता आमदारकीची सहा टर्म झाली आहे. त्यामुळे उद्या पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला चित्रपटात भूमिका दया, अशी मागणी महाजन यांनी एका चित्रपट निर्मत्याकडे केली. तीस वर्षे आमदारकीची झाली आहेत. पक्ष एकाच व्यक्तीला किती वेळा संधी देणार? त्यामुळे पक्षाने आम्हाला उमेदवारी नाही दिली आणि आम्ही रिटायर झालो तर भविष्यात आम्हालाही सिनेमात काम करण्याची संधी द्यावी, असं महाजन म्हणाले.
यावर बोलताना चित्रपट निर्माते बाबुराव घोंगडे गमतीने म्हणाले, तुमच्यासाठी इंग्रजी चित्रपट काढून त्यात काम करण्याची संधी देईन, असं घोंगडे यांनी म्हणताच एकच खसखस पिकली. जामनेर येथील बाबुराव घोंगडे यांनी ‘हलगट’ याचित्रपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सर्व जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.