धरणगाव (प्रतिनिधी) तरडे येथे तानसेन महाराज यांचे आशीर्वाद व सर्व ग्रामस्थ यांचे माध्यमातून संत तुकाराम महाराज बीज निमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरडे येथे तानसेन महाराज यांचे आशीर्वाद व सर्व ग्रामस्थ यांचे माध्यमातून गेल्या वीस वर्षापासून अखंड किर्तन नाम सप्ताह सुरू असून त्यात सन 2025 मध्ये प्रथमतं विशाल महाराज मुक्ताईनगर, प्रशांत महाराज बीड, सुप्रिया ताई साठे पुणे,आकुर महाराज गेवराई, सुप्रिया ताई आंधळे आळंदि, शिवलीला ताई पाटील कर्जत, संतोष महाराज बनवे बीड,गजानन महाराज वरसाडेकर यांचे सुमधुर श्रवणाचा कीर्तन सप्ताह आयोजित केला आहे. तरी सर्वांनी जागृत देवस्थान तानसेन महाराज, विठ्ठल रुखमाई यांचे दर्शनाचा व श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक व तरडे ग्रामस्थ यांचे वतीने करण्यात येत आहे.