जळगाव (प्रतिनिधी) हिंदु मुस्लीम एकता बिल्डींग पेन्टर युनियन जळगांव शहर या पेन्टर बांधवांच्या कार्यकारीणी समितीने एकमताने अकील खान मन्सुर खान यांची युनियनच्या सचिवपदी तर सुभाष तुळशिराम भोई यांची युनियनच्या सहसचिव पदी निवड केली आहे.
या कार्यक्रमास पेन्टर दगडू, जितेंद्र सहानी, अकीलबाबा, करण पेन्टर, शरीफ पठान, आमीर मिरची, आसीफ पेन्टर, अकील बाबा पेन्टर, नाना पेन्टर, मंगल पेन्टर, बाळासाहेब, महेश जाधव, सुदर्शन सहानी, सचिन सोनार, स्वामी पेन्टर, इरफान पेन्टर, गफुर पेन्टर, सुभान पेन्टर, शमीर पेन्टर, फारूक पेन्टर, अहमद खान पेन्टर, खलील शाह पेन्टर, भिकन पेन्टर तसेच युनियनचे सर्व सभासदांनी यावेळी उपस्थित होते. सर्वांनी एकमताने अकील खान मन्सुर खान यांची सचिवपदी निवड केली व त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.