जळगाव (प्रतिनिधी) हातभट्टीची दारू तयार करून विक्री करणाऱ्या महिलेवर दारुबंदी कायद्यांतर्गत आठ गुन्हे दाखल असून तीन वेळा प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. परंतु तरी देखील हातभट्टीची दारुविकरणाऱ्या आक्काबाई सुरेश चव्हाण (वय ४०, रा. सांगवी ता. चाळीसगाव) या महिलेवर स्थानबद्धतेची कारर्खा करण्यात आली. याबाबत आदेश जिल्हाधिकारी आयूष प्रसाद यांनी काढले असून आक्काबाईला अकोला कारागृहात रवाना करण्यात आले.
८ गुन्हे दाखल, ३ वेळा प्रतिबंधक कारवाई !
पोलिसांनी वेळोवेळी कारवाई करुन देखील गावठी दारुची सर्रासपणे विक्री केली जात आहे. त्यानुसार हातभट्टीची दारू तयार करून विक्री करणाऱ्या आक्काबाई चव्हाण हिच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत ८ गुन्हे दाखल असून ३ वेळा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यावर एमपीडीएतंर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, चाळीसगावचे पोलीस उपअधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाली चाळीसगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी तयार करुन तो पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे सादर केला होता.
अकोला कारागृहात केली रवानगी !
आक्काबाई चव्हाण या महिलेच्या एमपीडीच्या प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला. त्यांनी त्या महिलेला स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले असून त्यानुसार चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, लोकेश पवार, सहाय्यक फौजदार राजेंद्र साळुंखे, पोहेकॉ शांताराम पवार, संदीप पाटील, भुषण वंजारी, नंदू परदेशी, पोलीस नाईक गोवर्धन बोरसे, संदीप माने, मनोज पाटील, महिला पोलीस कर्मचारी मालती बच्छाव यांनी आक्काबाई चव्हाण यांना ताब्यात घेऊन तिची रवानगी अकोला येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
या पथकाची कारवाई !
हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, सहाय्यक फौजदार युनूस शेख, यूनुस शेख इब्राहिम, पोलीस हेड कॉन्सटेबल सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, ईश्र्वर पाटील यांच्या पथकाने केली. दरम्यान, जिल्ह्यातील इतर सराईत गुन्हेगार देखील कारवाईच्या रडावर असल्याचे बोलले जात आहे.