जळगाव (प्रतिनिधी) मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या तरूणाचा मृतदेह आज आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय ३३, रा. मेहरूण), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
प्रमोद उर्फ भूषण हा तरूण विद्यापीठा कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता. तो शनिवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आले आहे. आज दुपारी गिरणा नदीच्या जवळ असलेल्या महादेव मंदिराच्या खालील बाजूस त्याचा मृतदेह आढळून आला. प्रमोदचा खून करून मृतदेह फेकून दिल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. प्रमोदच्या गळ्यावर आणि हातवार धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून येत आहे. खून झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवायाला सुरुवात केली आहे. दरम्यान, प्रमोदचा खून कोणी आणि का केला ?, या पोलीस तपासातूनच समोर येणार आहे.