नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या काही वर्षात सर्व व्यवहार डिजिटल झाले आहेत. इंटरनेटच्या या युगात, कॉन्टॅक्टलेस पेमेंटमुळे QR कोडचा वापर झपाट्याने वाढला आहे. याच SBI ने ग्राहकांना QR कोड स्कॅनबाबत अलर्ट केलं आहे. ऑनलाईन पेमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचाच फायदा फ्रॉडस्टर्स करुन घेण्यात येत आहे. त्यामुळे ऑनलाईन ट्रान्झेक्शन करताना सतर्क राहणं गरजेच आहे.
SBI ने ट्विट करुन सांगितलं की, ज्यावेळी तुम्ही QR कोड स्कॅन करता, त्यावेळी तुम्हाला पैसे मिळत नाहीत. तुम्हाला केवळ एक मेसेज मिळतो, की तुमच्या बँक अकाउंटमधून इतकी रक्कम डेबिट केली गेली आहे. जर तुम्हाला कोणतंही पेमेंट करायचं नसेल, तर एखाद्याकडून पाठवण्यात आलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करू नका. SBI ने दीड मिनिटांचा एक व्हिडीओ शेअर करत, QR कोड स्कॅन केल्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे डेबिट होतात याबाबत सांगितलं आहे. QR कोडद्वारे केवळ पैसे पाठवता येतात, यामुळे पैसे आपल्या अकाउंटमध्ये येत नाही. त्यामुळे कोणी ऑफर किंवा इतर गोष्टींसाठी कोड स्कॅन करण्यास सांगितल्यास सतर्क व्हा.
QR कोड स्कॅन करून करताना अशी बाळगा सावधगिरी
– दुकानदार किंवा इतर कोणत्याही ठिकाणी QR कोड स्कॅन करून पेमेंट करताना सावध राहा. QR कोड स्कॅन करताना त्यात येणाऱ्या रिसिव्हरचं नाव आधी कन्फर्म करा. मेसेज किंवा ईमेलवर आलेल्या कोणत्याही QR कोडला स्कॅन करू नका.
– QR कोड फोनच्या कॅमेरातून थेट स्कॅन करण्याऐवजी, अशा App द्वारे करा, जो QR कोडचे डिटेल्सही सांगतो.
– QR कोड स्कॅन झाल्यानंतर बँकेतून झालेल्या कोणत्याही ट्रान्झेक्शनकडे लक्ष द्या आणि काही चुकीचं आढळल्यास त्वरित तक्रार दाखल करा. तसंच ऑनलाईन फ्रॉडबाबत सायबर सेलमध्येही युजर्स तक्रार दाखल करू शकतात.