मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाची लाट थोपवण्यात आपण यशस्वी झालो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत मात्र सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. तसंच अजूनही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तरीही सरकार पाठ का थोपटून घेत आहे?, ते समजत नाही असं म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
कोरोना काळात महाराष्ट्रात झालेला भ्रष्टाचार मन विषण्ण करणारा आहे असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला जी अंतरिम स्थगिती मिळाली ती या सरकारच्या अयोग्य भूमिकेमुळेच असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.