साकेगाव ता. भुसावळ : येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालया तील 1998-99 सालच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थीनींचा स्नेह मेळावा आज 15 रोजी मंगलमूर्ती लॉन्स येथे मोठ्या उत्सवात पार पडला.
प्रथम माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट देऊन प्रार्थनेला हजेरी लावली. त्यानंतर भुसावळ रोडवरील मंगलमूर्ती लॉन्स येथे पुढील कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ. कोल्हे मॅडम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक नामदेव सावळे, शिक्षक नेमाडे, दिलीप मराठे, श्री. भारुडे, संध्या चौधरी, नेमाडे मॅडम, राजू पाटील दिगंबर सपकाळे, परेश सपकाळे यांच्यासह शाळेचे शिपाई सुनील पाटील, रमेश सोनवणे, पांडुरंग दादा, एकनाथदादा, नामदेव दादा उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी विद्यार्थी जयेश राणे, डॉ. कैलास ठाकरे, नारायण कोळी यांनी केले. सुरुवातीला दिवंगत शिक्षक एस. एस. पाटील, देशमुख सर, विद्यार्थी धर्मेंद्र पाटील, सुधाकर सोनवणे, चंद्रकांत जावळे, वाजीद शेख यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर आपल्या जीवनात गुरुजनांचे किती महत्व आहे, या भावनेतून उपस्थित शिक्षकांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रथम माजी विद्यार्थी यांनी आप – आपला परिचय करून देत शाळा व शिक्षकांविषयी आदर व्यक्त केला. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. दुपारी सर्वांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला. 25 वर्षानंतर भेटलेल्या माजी विद्यार्थी व शिक्षकांच्या मनसोक्त गप्पा झाल्या. सर्व विद्यार्थी एकत्र आल्याने जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. विदयालयचे चेअरमन दिलीपसिंग पाटील यांनीही थोडा वेळ उपस्थिती दिली. शेवटी आभार डॉ. ठाकरे यांनी मानले. यावेळी माजी विद्यार्थी नरेंद्र फालक, नारायण कोळी, जयेश राणे, एजाज पटेल, विकास पाटील, दिपक पाटील, सुनीता भागवत, देवेंद्र पाटील, किरण जावळे, हर्षल पाटील, योगेश भोई, पंकज पाटील, किशोर पाटील, विजय खंबायात, प्राजक्ता नेहेते, ललित कोल्हे, चंदू उपासे, इम्रान खान, गोविंदा कचरे, वैशाली लोणे, जाकिर शेख, हमीद पटेल, सोनाली वाघोदे, भारती भारुडे, कैलास ठाकरे, प्रमोद सोनवणे, गणेश पाटील, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.