TheClearNews.Com
Sunday, November 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आनंदीमय जीवनासाठी सदैव दिव्यांगांच्या पाठीशी : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची दिव्यांगांना भेट - 125 इलेक्ट्रिक तीनचाकी सायकलींचे वाटप !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 3, 2023
in धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 29 नोव्हेंबर ते 05 डिसेंबर 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 28 नोव्हेंबर 2026 !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांगांना दिली जाणारी मदत ही सामाजिक भावनेतून केली जात असून यात कृतज्ञता व विनम्रताही भावना आहे. दिव्यांगाने स्वतःतील सामर्थ्य ओळखून आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे राहावे, जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास ही मोठी ताकद आहे. दिव्यांगांना मदत म्हणजे ईश्वरी सेवा असून दिव्यांगांना आनंदीमय जीवन जगता यावे यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. असे प्रतिपादन प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दर्जेदार प्रतीच्या सुमारे 125 इलेक्ट्रिक तीन चाकी सायकलींचे वाटप करण्यात आले. विशेष अतिथी म्हणून मुंबई येथिल एच.डी.एफ.सी. बँकेचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट राघवेंद्र स्वामी, व्हा. प्रेसिडेंट अजीज गांधी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मंत्री गुलाबरावानी स्वतः इलेक्ट्रिक तीनचाकी सायकल चालवत स्वतः सादरीकरण (डेमो) केले.
3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पाळधी येथिल सुगोकी लान येथे आयोजित करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक तीन चाकी सायकल वितरण प्रसंगी केले. भव्य दिव्य अश्या सोहळ्याचे आयोजन व नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशन व मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील यांनी “ मंजिल उन्हे को मिलती है जिसके सपनो मे जान होती है ! पंखो से कुछ नही होता हौसले से उडान होती है !! हिम्मत मत खोना अभी बहुत आगे जाना है !जिन्होने कहा था तेरे बस का नही, उन्हे भी करके दिखाना है !!” या शेरो शायरीने भाषणाची सुरुवात करून सांगितले की, ई – बाईकचा वापर व्यवसायासाठी प्रामाणिकपणे करून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा. दिव्यांगानी राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. येत्या 10 डिसेंबर पासून सरपंच व ग्रामंचायतींनी प्रत्येक गावात आभा कार्ड देण्यासाठी आयुष्यमान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले.
एच.डी.एफ.सी. बँकेच्या सहकार्याने मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून सी. एस.आर. फंडातून 2 कोटी 50 लक्ष किमतीच्या 500 इलेक्ट्रिक तीन चाकी सायकली मंजूर केल्या असून त्यापैकी आज 125 इलेक्ट्रिक तीन चाकी सायकलींचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सायकलींची मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली ही विशेष ! उर्वरित साहित्य पुढील टप्यात जळगाव तालुक्यात वितरित करण्यात येणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तर मनोगतात मुंबई येथिल एच. डी. एफ. सी. बँकेचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट राघवेंद्र स्वामी यांनी मंत्री गुलाबराव पाटील व जि.प सदस्य प्रतापराव पाटील यांच्या सामाजिक कार्याचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः दिव्यांग व्यक्तींकडून समस्याही जाणून घेतल्या.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रम प्रसंगी मुंबई येथिल एचडीएफसी बँकेचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट राघवेंद्र स्वामी, व्हा. प्रेसिडेंट अजीज गांधी, सचिन भाटकर, खाजगी सचिव अशोक पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, शिवराज पाटील, संजय पाटील सर, गजानन पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, माजी सभापती प्रेमराज पाटील, मुकुंदराव नन्नवरे, उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील सर, दूध संघाचे संचालक रमेश आप्पा पाटील, सरपंच संघटनेचे सचिन पवार, दामू अण्णा पाटील, भगवान पाटील, शहर प्रमुख विलास महाजन, भानुदास विसावे, गोकुळ लंके, धनराज कासट, धीरेंद्र पुरभे, प्रिया इंगळे यांच्यासह तालुक्यातील सरपंच , उपसरपंच व सदस्य , दिव्यांग बांधव, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी दिव्यांग व्यक्तींना सायकल वाटपचे महत्व विशद करून 80% समाजकारण व 20% राजकारण , या शिवसेनेच्या ध्येय धोरणे प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. टप्या – टप्याने उर्वरित इलेक्ट्रिक तीन चाकी सायकलींचे वाटप करण्यात येणार असून त्यासाठी गरजू व पात्र व्यक्तींनीच लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रतापराव पाटील यांच्या प्रभावशाली भाषणाने उपस्थितांसह व्यासपीठावरील मान्यवरही भारावून गेले होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन भूषण पाटील सर यांनी केले तर आभार भाऊसो गुलाबराव पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सोनवणे , अरुण पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 29 नोव्हेंबर ते 05 डिसेंबर 2026 !

November 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 28 नोव्हेंबर 2026 !

November 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 नोव्हेंबर 2026 !

November 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 26 नोव्हेंबर 2026 !

November 26, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 25 नोव्हेंबर 2026 !

November 25, 2026
अमळनेर

श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह

November 24, 2026
Next Post

मुलीला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या दाम्पत्यावर काळाचा घाला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केल : देवेंद्र फडणवीस

December 25, 2020

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांची प्रकृती खालावली…!

October 14, 2020

दुर्दैवी : बाळ जन्मले पण आईचा मृत्यू !

January 22, 2022

उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

November 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group