अमळनेर (प्रतिनिधी) आईने मुलासह गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील शिरूड येथे घडली. पूर्वी सोनवणे आणि वृषांत सोनवणे असे मयत मायलेकाचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक असे की, अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील माहेर असलेल्या पुर्वी सोनवणे यांचे कौटुंबिक वाद असल्याने त्या मुलगा वृषांत याच्यासोबत माहेरी शिरूड येथे आईवडीलांकडे राहत होत्या. शुक्रवार १७ जून रोजी सकाळी पूर्वी सोनवणे यांचे वडील वसंत पाटील हे वरच्या मजल्यावर गेले असता मुलीने मुलासह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलीसह नातवाचा मृतदेह पाहून त्यांनी प्रचंड आक्रोश केला. दरम्यान, महिलेने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.