अमळनेर (प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयामध्ये तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांना भाजपच्यावतीने निवेदन देत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच हे निवेदन अमळनेर पोलीस निरीक्षक यांना देखील देण्यात आले आहे.
राज्याचे माजी पोलिस आयुक्तांनी गृहमंत्र्यांनी दरमहा १०० कोटीची मागणी केल्या बाबत लेखी स्वरूपात तक्रार मुख्यमंत्र्याकडे केली असुन गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
सोमवारी येथील तहसील कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्यावतीने निवेदन देण्यात आले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लिखित स्वरूपात पत्र देत सणसणीत आरोप केले आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना सांगितले होते की, मला तुम्ही प्रति महिन्याला १०० कोटी रुपये जमा करून द्यावे. एकुण हा गंभीर स्वरूपाचा आरोप करण्यात आला असुन गृहमंत्री देशमुख खंडणीखोर, भ्रष्टाचारी आहेत. हे यावरून दिसुन येते तेव्हा त्यांना राज्याच्या गृहमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा जर त्यांनी तात्काळ राजीनामा दिला नाही तर भारतीय जनता पार्टीच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाव्दारे देत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, माजी जि.प.सदस्य अँड. व्ही.आर. पाटील, सरचिटणीस राकेश पाटील, उमेश महाराज (दहिवद) आदी उपस्थित होते.