चंदीगड (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजबाच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून यामुळे राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अखेर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मात्र, खुद्द सोनी यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिल्याचेही समोर आले आहे.
हायकमांडच्या आदेशानंतर अंबिका सोनी चंदीगडला येत आहेत. त्यांना घेण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचं हेलिकॉप्टर रवाना झालं आहे. त्यामुळे सोनी याच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आज ११ वाजता आमदारांची बैठक होती. मात्र, सिद्धू समर्थक या बैठकीत सिद्धू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता असल्याने हायकमांडने ही बैठकच रद्द केली आहे. सिद्धू गटाने डोकं वर काढू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. तसेच सिद्धू यांना त्यांच्या समर्थकांना शांत करण्याचा सल्लाही देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
अंबिका सोनींचा नकार
दरम्यान, आरोग्याचं कारण पुढे करत अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिल्याचं सांगितलं जात आहे.