मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी ताप येत असल्यामुळे खबरदारी म्हणून अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर अमीत ठाकरे यांच्या तातडीने काही चाचण्या केल्या गेल्या होत्या. त्यामध्ये कोरोना चाचणीचाही समावेश होता. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आला होता. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
लीलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर अमित ठाकरे यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आला होता. तसेच मलेरिया आणि इतर चाचण्याही निगेटिव्ह आल्या होत्या. डॉक्टरांचे असे म्हणणे होते की, हा ताप व्हायरल असण्याची शक्यता आहे. परंतु, सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील एक ते दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहितीही त्यावेळी डॉक्टरांनी दिली होती. तसेच त्यांच्या टेस्ट नेगेटिव्ह आल्यामुळे काहीही घाबरण्याचं कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितले होते.
दरम्यान, अमित ठाकरे यांच्यावर पक्षात सध्या मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून अमित ठाकरे राजकारणात सक्रिय आहेत. तसेच ते डॉक्टरांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न यांवर स्वतः पुढाकार घेऊन काम करत आहेत.