पाळधी(प्रतिनिधी) : येथील मोहम्मद ताहेर पटनी उर्दू हायस्कूल तर्फे अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता गावातील ज्येष्ठ नागरिक मिर्झा लाल बेग यांच्या हस्ते ध्वज रोहण करण्यात आले. यावेळी हाजी सुलतान, मौलाना अशफ़ाक, हाजी यासीन, साजिद सर, इकबाल नजीर, मन्नान खाटीक, शकील खान व इतर मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला ज्येष्ठ शिक्षक शाह सईद यांनी मनोगत व्यक्त केले.
ध्वजरोहणा नंतर मुख्याध्यापक मुश्ताक करीमी यांनी सांगितले की शासनाच्या आदेशाप्रमाणे अमृत महोत्सव अंतर्गत विविध स्पर्धा उपक्रम राबवून मोठे आनंद होत आहे. विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या उत्साहाने अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होत आहे. यावेळी विद्यार्थिनींनी तिरंग्याच्या रंगाप्रमाणे ओढणी परिधान केली होती. शाळेतर्फे रॅली काढून व घोषणा देऊन अगदी शिस्तबदरीत्या ग्रामपंचायत येथे दोनशेहून अधिक विद्यार्थी ग्रामपंचायत येथे पोहोचले. विद्यार्थ्यांनी भारत अपना गुलशन है, भारत दिल की धडकन है हम पढेंगे देश बढेगा, देश बढेगा हम बढेंगे भारत मेरी जान है भारत मेरी शान है अशा घोषणा दिल्या या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेघले आणि त्याच्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेले. अकील अजीज, समरीन कलीम, नईम बिस्मिल्ला, रुबीना रसूल, काजी चिराग, वसीम शेख व ज़हूर देशपांडे यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
















