TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमृत योजना, भूमीगत गटारीच्या मक्तेदारांना सूचना : महापौर भारती सोनवणे

आरोग्य, बांधकाम, विद्युत विभागाची महापौरांनी केली कानउघडणी

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरात अमृत योजना आणि भूमीगत गटारींच्या कामामुळे नागरिकांना त्रास होत असून दोन दिवसांपूर्वी पाऊस पडल्याने नागरिकांची ओरड होत आहे. प्रत्येक विभागाने एकमेकांशी समन्वयक ठेवून तात्काळ दुरुस्तीची कामे करावी अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या. तसेच अमृत योजना आणि भूमीगत गटारींच्या मक्तेदाराला चाऱ्या बुजण्याच्या देखील सूचना केल्या.

शहरातील साफसफाई, एलईडी, बांधकाम विभाग, अमृत योजना, भूमीगत योजनेचे मक्तेदार प्रतिनिधी यांची बैठक घेत शनिवारी महापौरांनी चांगलीच कानउघडणी केली. बैठकीला महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, भारत सपकाळे, शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश बोरोले, अमृत, भूमीगत योजनेचे मक्तेदार प्रतिनिधी, आरोग्य निरीक्षक तसेच सर्व अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

भूमीगत गटारींच्या चेंबरची तपासणी करणार
शहरात भूमीगत गटारींच्या कामासाठी ठिकठिकाणी चेंबर तयार करण्यात आले आहे. भूमीगत गटारींच्या कामाबद्दल नागरिकांमध्ये विविध शंका असून त्यामुळे गैरसमज पसरत आहे. मक्तेदाराला सूचना देऊन गैरसमज दूर करण्यासाठी त्या चेंबरची तपासणी करण्याचे सांगितले. शहरात मुख्य ९ हजार पैकी ४ हजार चेंबर पूर्ण झाले असून त्याठिकाणी चेंबरची धारण क्षमता तपासणीसाठी लोड टेस्ट करण्यात येणार असल्याची मक्तेदार प्रतिनिधीने दिली. तसेच कामासाठी वापरण्यात येणाऱ्या विटा, वाळू, सिमेंटचा दर्जा, गुणवत्ता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तपासणी करून तसे प्रमाणपत्र घेतले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. २५ जानेवारीपासून मशीनद्वारे दररोज ५ याप्रमाणे १० दिवसात वेगवेगळ्या प्रभागातील ५० चेंबरची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी करताना मनपा पदाधिकारी आणि अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

एलईडीच्या कामाला सोमवारपासून मिळणार गती
शहरात एलईडी बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मक्तेदार सोमवारपासून कामगार वाढविणार असून दररोज किमान ३५० एलईडी बसविण्यात येतील. कामगार वाढणार असल्याने सोमवारपासून कामाला गती मिळणार असून एक-एक रोहित्रच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व खांबावर एलईडी टप्प्याटप्प्याने बसविण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.

अमृत, भूमीगतच्या चाऱ्या बुजवून सफाई करा
अमृत योजना आणि भूमीगत गटारींच्या चाऱ्या बुजविल्यानंतर शिल्लक असलेली बारीक खडी तात्काळ उचलण्यासाठी मनपाचे मनुष्यबळ वापरून काम करावे. मक्तेदारांची मदत घ्यावी. सोमवारपासून एकही परिसरातून तक्रार येता कामा नये. आरोग्य विभागाने झाडूने साफ करून घ्यावे अशा सूचना महापौरांनी दिल्या.

शहरात पुढील आठवड्यापासून स्वच्छता अभियानाला सुरुवात
गोलाणी मार्केटच्या तळघरात पाणी साचते ते सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा. शहराच्या साफसफाईसाठी ५ झोन पाडण्यात आले आहेत. एकाच दिवशी संपूर्ण परिसराची स्वच्छता होण्यासाठी नियोजन करण्यात आले असून महापौर भारती सोनवणे यांनी याबाबत स्वच्छता निरीक्षकांना सूचना दिल्या.

रस्ते दुरुस्तीच्या कामाची होणार पाहणी
शहरात प्रत्येक प्रभागातील खड्डे बुजविण्यासाठी मनपाने मक्ता दिलेला आहे. काही प्रभागात अद्यापही काम सुरू झालेले नसून नागरिकांची ओरड होत आहे. कामाचा दर्जा तपासण्यासाठी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती अचानक पाहणी करणार आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

April 7, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
जळगाव

जिल्हास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निवारणाला गती

April 7, 2026
जळगाव

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

April 6, 2026
जळगाव

सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (CGD) नेटवर्कचा विस्तार : राज्यस्तरीय बैठक संपन्न

April 6, 2026
भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
Next Post

संतापजनक! भारताच्या मोहम्मद सिराजबद्दल सिडनी मैदानातील प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य शुक्रवार २५ मार्च २०२२ !

March 25, 2022

जी.एस.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविली सैनिकांसाठी दिवाळी शुभेच्छापत्रे

October 27, 2021

बीएचआर घोटाळा : तपास एलसीबीने नव्हे ‘ईओडब्ल्यू’नेच केला, तत्कालीन एसपींनी केंद्राला पाठवले होते पत्र !

December 1, 2020

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार १४ ऑक्टोबर २०२२ !

October 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group