धुळे (प्रतिनिधी) साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य गजमल दहीलू पवार (७१) हे शनिवारी (दि. २२) पहाटे ४ : १० वाजेच्या सुमारास शेतातील घरात बैलांना चारा टाकत टाकत असताना त्यांना सर्पदंश झाला.
घरच्यांच्या लक्षात येताच पवार यांना उपचारासाठी रोहोड येथील प्राथमिक केंद्र व पिंपळनेर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते बारापाडा, चौपळे, पंचक्रोशीत आदिवासी पावरीनृत्य कलाकार होते. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.