जळगाव (प्रतिनिधी) किनगावहून कानळदा येथे दुचाकीने जात असतांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरूण शेतकरी जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर झाल्याची घटना रात्री घडली आहे.
सागर मधुकर कोळी (वय-२१,रा. किनगाव ता. यावल) हा शेती कामाच्या निमित्ताने २६ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील कानळदा येथे मित्रांसह दुचाकीने जात होता. साधरण रात्री ९ वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने सागरच्या दुचाकीला धडक दिली. त्यात सागरचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला होता. वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन अहीरे यांच्या खबरीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद शिंदे करीत आहे.