जळगाव (प्रतिनिधी) महामार्गावरील बांभोरी पुलाजवळ पायी चालणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे गुणवंत पाटील (वय २६, रा.डोंबिवली, जि.ठाणे), असे मयत तरुणाचे नाव आहे.
आज (गुरुवार) सकाळी १० वाजता गुणवंत पाटील हा तरुण रस्त्याने पायी जात होता. त्याच्याजवळ दवाखान्याच्या उपचाराचा कागदपत्रे असलेली पिशवी होती. अचानक त्याला भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने चिरडले. या अपघाताची माहिती डायल ११२ वर मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे किरण अगोने व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुणवंत याच्या पोटावरुन चाक गेले होते. त्याला तातडीने शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. कागदपत्रांवरुन तो डोंबिवलीचा रहिवाशी असून कल्याण येथे उपचार घेतले आहेत. तो जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी किंवा त्याचे कुणी नातेवाईक इथं असावेत असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.