मुंबई (वृत्तसंस्था) एनसीबीने गुरुवारी आर्यन खान ड्रग्स प्रकरणाबाबत अनन्या पांडेची २ तास चौकशी केली. पहिल्या दिवसाच्या चौकशीत अनन्या वडील चंकी पांडेसोबत पोहोचली होती. मात्र, चौकशीच्या आधीच वडिलांना बिलगून अनन्या पांडे ढसाढसा रडली. त्यानंतर एनसीबीने अनन्याला ड्रग्जबद्दल प्रश्न विचारले.
आर्यन खान आणि अनन्या पांडेच्या गप्पांमध्ये आर्यन अनन्याशी एका ठिकाणी गांजाबद्दल बोलत होता. आर्यन विचारत होता की, काही जुगाड होऊ शकतो का? यावर अनन्याने उत्तर दिले आणि सांगितले की, मी व्यवस्था करीन. एनसीबीने अनन्याला हे चॅट दाखवले आणि काही प्रश्न विचारले, ज्यावर अनन्या म्हणाली की, ती फक्त विनोद करत होती. अनन्या पांडेने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की आर्यनशी तिच्या गप्पा ड्रग्सबद्दल नाही तर सिगारेटबद्दलच्या आहेत. दोघांमध्ये सिगारेटबद्दल संभाषण झाले होते. अनन्याने सांगितले की, तिने कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही. एनसीबीच्या मते, आतापर्यंत असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत की, अनन्याने आर्यनसाठी कधीच कोणत्याही ड्रग्जची व्यवस्था केली आहे. मात्र, आर्यन-अनन्या यांनी ड्रग्जबाबत एकदा नव्हे, तर अनेक वेळा संभाषण केले आहे.
वडिलांना बिलगून रडली अनन्या पांडे
पहिल्या दिवसाच्या चौकशीत अनन्या वडील चंकी पांडेसोबत पोहोचली होती. चौकशी कक्षात प्रवेश करण्यापूर्वी अनन्या खूप घाबरली होती आणि वडील चंकी पांडेला मिठी मारून रडली. नंतर, अनन्या एकटीच चौकशी कक्षात दाखल झाली, जिथे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली. विशेष म्हणजे समीर वानखेडे यांनी स्वत: अनन्याची चौकशी केली.