जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द येथे ‘माझी वसुंधरा’ योजनेच्या अध्यक्षपदी मराठी मराठी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अँड. जमील देशपांडे यांची पाळधी ग्रामपंचायतीने नुकतीच निवड केली आहे.
माझी वसुंधरा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेसाठी ग्रामस्तरीय समितीपदी निवड करण्यात आली आहे. मराठी प्रतिष्ठाणच्या माध्यमातून जळगाव शहरात मोठया प्रमाणात वृक्षारोपण व पर्यावरण बाबत गेल्या तीन वर्षांपासून काम करत आहे. पाळधी ता. धरणगाव येथे शासनाच्या माझी वसुंधरा योजनेअंतर्गत पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश यावर काम होणार आहे. या करीता मराठी प्रतिष्ठाणचे सर्व सदस्य आपले योगदान देणार आहे.
माझी वसुंधरा योजनेत पाळधी ग्रामपंचायत जिल्ह्यात अतिशय उत्तम काम करेल, असा मानस अँड. जमील देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. अँड. जमील देशपांडे यांच्या निवडीबद्दल पाळधी खुर्दचे उद्योजक दिलीप पाटील, सरपंच, उपसरपंच यांनी अभिनंदन केले आहे.