नशिराबाद (प्रतिनिधी) कॉपर तारांचे भंगार देण्याच्या बहाण्याने बोलवून आंध्रप्रदेशच्या व्यापाऱ्याचा दीड लाखांचा ऐवज पाच तरुणांनी लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासचक्र फिरवीत पाचही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
आंध्र प्रदेशतील व्यापारी दुर्गा व्यंकटेश सुर्यनारायण काटाकोट यांना दोन वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून पाच तरुणांनी कॉपर तारांचे भंगार देण्याच्या बहाण्याने जळगाव जवळील भादली गावा जवळ बोलावून घेतले. त्यानंतर मारहाण आणि जिवेठार मारण्याची धमकी देत गळ्याची सोन्याची चैन, सोन्याची अंगठी, घड्याळ, रोकड, मोबाईल आणि ऑनलाईन ५० हजार रुपये ट्रान्स्फर करून असा एकूण एक लाख ५१ हजाराचा ऐवज बळजबरीने हिसकावून पळ काढला.
व्यापारी दुर्गा व्यंकटेश यांनी तत्काळ नशिराबाद पोलिसात धाव घेतली. नशिराबाद पोलिसांनी पोलिसांनी तपासचक्र फिरवीत पाचही संशयित आरोपींना मुक्ताईनगर तालुक्यातील जंगलातून रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पीएसआय गणेश देशमुख हे करीत आहेत.